व्हेज फ्रँकी 
               आपण सर्वांना हॉटेल मधील snacks खूप आवडतात , पण ते खाणे तितकंच धोक्याचं हि राहत म्हणूनच मी  घरच्या घरी बनवता येईल अशी व्हेज फ्रँकी ची रेसिपी घेऊन आलेले,आहे तुमच्यासाठी----
साहित्य
- रोटिसाठी
- १/२ कप पीठ मैदा रोटिसाठी
- १/4 कप गव्हाचे पीठ
- 1 tbsp तेल
- चवीनुसार मीठ
- कणीक करण्यासाठी 1/4 tbsp तेल
- आवश्यकतेनुसार पाणी
- सारणासाठी
- १/२ tbsp तेल
- 1 tbsp लसूण ठेचून
- 4 मोठे उकडलेले, सोललेली आणि स्मॅश केलेले बटाटे
- १/२ tbsp तिखट
- १/२ tbsp गरम मसाला
- १/२ tbsp धना पावडर
- १/२ tbsp चाट मसाला
- १/4 कप चिरलेली कोथिंबीर
- चवीनुसार मीठ
- रोटी वरती भरण्यासाठी
- 1 tbsp लेमन ज्यूस
- १ चिरलेली मिरची
- १ चमचा चाट मसाला पावडर
- १ वाटी कोबी चे काप
- १ वाटी कांदा उभा कापून
- टोमॅटो केचअप
पद्धत
                              एका भांड्यात मैदा ,  गव्हाचे पीठ, चवीनुसार मीठ, तेल आणि पाणी घाला.सर्व साहित्य एकत्र करून मळून घ्या.एखाद्या ओलसर कापडाने झाकून ठेवा आणि 15-20 मिनिटे विश्रांती घ्या.
           कढईत थोडे तेल घालावे, तेल गरम होत असताना काही लसूण बारीक वाटून घ्या आणि लसूण तेलात तपकिरी होई पर्यंत  परतून घ्यावे . बटाटे स्मॅश करून पॅनमध्ये घाला.  छान आणि समान रीतीने मीठ, तिखट, चाट मसाला, धणे पूड आणि गरम मसाला  घाला आणि परत शिजल्यावर परत हलवून  घ्या. 
            कणिकचा लिंबाचा आकाराचा बॉल बनवून घ्या ,आता ते लाटून घेऊन मध्यम असं पातळ लाटा .  गरम झालेल्या पॅनवर केलेली रोटी  ठेवा आणि पृष्ठभागावर काही फुगे येईपर्यंत शेकून घ्या .  हे पलटवा आणि थोडेसे तेल लावा .  आणि गॅसवरून खाली उतरवा .  
        शेकून घेतलेल्या रोटी वरती , थोड केचप लावा आणि मग त्यावर कोबी व कांदा घालून बटाट्याचे  केलेलं सारण  दंडगोलाकार आकार करून त्यावरती ठेवून द्या . आता त्यावरती लिंबूचा रस थोडं टाका .थोडी चाट मसाला स्प्रिंकल करा  आणि चीज असेल तर वरती घालून .  फ्रँकी रोल करा... 
                       व्हेज फ्रँकी सर्व्ह करण्यास तयार आहे. सोबत टोमॅटो केचप देऊन सर्व्ह करा ... 
___________________________________________________________________________________________________________________________
English Translation:
Veg Frankie --
               We all love hotel snacks, but eating them is just as dangerous, so here's a recipe for Veg Frankie that I can make at home.
Ingredients:
- for bread
- 1/2 cup flour for bread
- 1/4 cup wheat flour
- 1 tbsp oil
- Salt to taste
- 1/4 tbsp oil to make dough
- Water as needed
- For the mixture
- 1/2 tbsp oil
- 1 tbsp crushed garlic
- 4 large boiled, peeled and smashed potatoes
- 1/2 tbsp chili powder
- 1/2 tbsp garam masala
- 1/2 tbsp coriander powder
- 1/2 tbsp chaat masala
- 1/4 cup chopped cilantro
- Salt to taste
- To fill the top of the bread
- 1 tbsp lemon juice
- 1 chopped chilli
- 1 tablespoon chaat masala powder
- 1 cup cabbage slices
- Cut 1 cup onion vertically
- Tomato ketchup
Method
                              In a bowl, add flour, wheat flour, salt, oil and water to taste. Combine all the ingredients and knead. Cover with a damp cloth and let it rest for 15-20 minutes.
   Add a little oil to the pan, grind some garlic while oil is hot and fry in garlic oil till it becomes brown. Smash the potatoes and put in the pan. Add salt, chilli powder, chaat masala, coriander powder and garam masala nicely and evenly and stir again when cooked.
            Make a lemon shaped ball of dough, now roll it into medium thin waves. Place the bread on a heated pan and bake until some bubbles appear on the surface. Turn it over and apply a little oil. And get off the gas.
        On top of the baked bread, put some ketchup and then put cabbage and onion on it and put potato paste on it in a cylindrical shape. Now add a little lemon juice. Sprinkle a little chaat masala and if there is cheese, add it on top. Roll Frankie ...
                       Veg Frankie is ready to serve. Serve with tomato ketchup
 


 
0 Comments